लेख
भगवान महावीरांचा संदेश
आजहि जगाला तारक
भगवान महावीरांची जयंती दरवर्षी देशात सर्वत्र जैन बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक झाल्यावर जैन बांधव भगवान महावीरांची पालखीने मिरवणूक काढतात. जैन धर्माचे महावीर स्वामी हे २४ वे तीर्थकर. भगवान महावीरांचा जन्म कुंडलपूर येथे झाला. आईचे नाव त्रिशला, वडिलांचे नाव सिध्दार्थ होते.
भगवान महावीरांनी 'जगा आणि जगू द्या' हा महान संदेश जगाला दिला. त्यांचा संदेश जगाला तारणारा आहे. विज्ञानाने प्रगती करून शक्तिशाली बॉम्ब बनविले. त्याचा उपयोग युध्दात झाल्यास जगाचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत महावीरांचा
संदेश जगाला तारणारा आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. भगवान महावीरांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी दीक्षा घेतली. जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व आहे. भगवान महावीरांनी दिलेला संदेश खूप महान आहे. भगवान महावीरांचा संदेश 'भुखे को भोजन दान, बीमारको दवा, अज्ञानी को ज्ञानदान पतितों की सेवा' आहे. जैन धर्मात भगवान महावीरांपूर्वी २३ तीर्थकर होऊन गेले. ते असे- वृषभजी, सुपार्श्वजी, चंद्रप्रभजी, पुष्पदंतजी, शितलजी, श्रेयांसजी, वासूपूज्यजी, विमलनाथजी, अनंतनाथजी, धर्मनाथजी, शांतीनाथ, कुंथूनाथजी, पार्श्वनाथजी स्वामी आणि २४ वे तिर्थकर भगवान महावीर स्वामीजी हे होत.
लहानपणी मुले खेळताना त्यांना एक साप दिसला. सगळी मुले घाबरून पळून गेली. परंतु बालमहावीर यांनी न घाबरता सहज लीलया त्या सापाला उचलून दूर टाकले. त्यांच्या पराक्रमाने त्यांना महावीर, सन्मती, 'वीर' 'अतिवीर' अशी नावे पडली.
'अहिंसा परमो धर्मः' जैन धर्मात तर आपल्या बोलण्याने जरी कुणाचे
मन दुखावले तर त्यालासुध्दा पाप म्हणतात. म्हणूनच भाद्रपदात क्षमावाणी महापर्व करतात. या दिवशी जैन लोक एकमेकांना गतवर्षात झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागतात. जैन धर्मातही दोन पंथ आहेत. श्वेतांबर आणि दिगंबर. पंथ दोन असले तरी २४ तिर्थकरांची पूजा, अर्चा, अभिषेक करतात.
भ. महावीर संसारात रमले नाहीत. जैन धर्माचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. माणसाने मरणाला कधीही घाबरू नये. जो मनुष्य मरणाला घाबरतो तो कधीच चांगले जगू शकत नाही. भगवान महावीर म्हणून, प्रत्येक आत्म्याने महावीरांसारखे व्हावे. भगवान महावीरांनी १२ वर्षे कठोर तपस्या केली. तेव्हाच त्यांना सत्यरूपी जनतेचे त्यांना ज्ञान दिले. ते संयमी व बुद्धिनिधी होते.
'महावीर' यातील प्रत्येक अक्षराचा महत्त्वा आहे. 'म' म्हणजे मन ताब्यात ठेवणे. 'हा' म्हणजे हाताने दान देणे, 'वी' म्हणजे वीरांपेक्षा गुण शिकणे. 'र' म्हणजे रत्नासारखे कार्य करणे. कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये. अहिंसा जैन धर्माचे सार आहे. यास्तव
भारतीय
मुक्खपर्णांनंतरच्या पहिल्या पानावर भगवान महावीरांची छायाचित्र आहे.
भगवान महावीरांची ती निमुर्णपत्री पाषाणै आहे. पाप
बंसानून मुक्ती देणारी भूमी म्हणून पापपुर्णरीला मान देतात.
भगवान महावीरांनी शेवटचा चातुर्मास पावा हस्तमैथन यांच्या रजपूत राजाच्या शाळेत केला. ९६ गण्यांच्या राजांनी पुण्याची येथे येऊन महावीरांनीर्वाणोत्सव साजरा केला. आचार्य जिनसेन यांनी इ.स. ७८३ मध्ये हरिवंश पुराणाची रचना केली. दीपावली सण जैन बांधवांनी प्रथम पाषापुरी येथे साजरा केला. भगवान महावीरांचा निर्वाण दिवस निर्वाण म्हणून मुक्ती. महावीरांची जीवनपद्धती ज्ञान, चारित्र्य, श्रध्दा देते. भगवान महावीरांनी निर्वाणपुर्वी सांगितले स्वतःचे दिले स्वतः व्हा. तुझी स्वतः प्रकाशन करा. तेव्हा दुसऱ्या कुणाच्या प्रकाशाची गरज भासणार नाही. लेखात काही त्रुटी असल्यास काही चूक असल्यास क्षमस्व.
शब्दांकन
सुभाष शांताराम जैन,लेखक
छायाचित्रकार,पत्रकार कवी,सामाजिक कार्यकर्ता.
व्हाट्सअप 9821821885
Comments
Post a Comment