भगवान महावीरांचा संदेश आजही जगाला तारक

भगवान महावीरांचा संदेश

आजहि जगाला तारक

भगवान महावीरांची जयंती दरवर्षी देशात सर्वत्र जैन बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक झाल्यावर जैन बांधव भगवान महावीरांची पालखीने मिरवणूक काढतात. जैन धर्माचे महावीर स्वामी हे २४ वे तीर्थकर. भगवान महावीरांचा जन्म कुंडलपूर येथे झाला. आईचे नाव त्रिशला, वडिलांचे नाव सिध्दार्थ होते.

भगवान महावीरांनी 'जगा आणि जगू द्या' हा महान संदेश जगाला दिला. त्यांचा संदेश जगाला तारणारा आहे. विज्ञानाने प्रगती करून शक्तिशाली बॉम्ब बनविले. त्याचा उपयोग युध्दात झाल्यास जगाचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत महावीरांचा

संदेश जगाला तारणारा आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. भगवान महावीरांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी दीक्षा घेतली. जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व आहे. भगवान महावीरांनी दिलेला संदेश खूप महान आहे. भगवान महावीरांचा संदेश 'भुखे को भोजन दान, बीमारको दवा, अज्ञानी को ज्ञानदान पतितों की सेवा' आहे. जैन धर्मात भगवान महावीरांपूर्वी २३ तीर्थकर होऊन गेले.

       २४ वे तिर्थकर भगवान महावीर स्वामीजी हे होत.

लहानपणी मुले खेळताना त्यांना एक साप दिसला. सगळी मुले घाबरून पळून गेली. परंतु बालमहावीर यांनी न घाबरता सहज लीलया त्या सापाला उचलून दूर टाकले. त्यांच्या पराक्रमाने त्यांना महावीर, सन्मती, 'वीर' 'अतिवीर' अशी नावे पडली.

'अहिंसा परमो धर्मः' जैन धर्मात तर आपल्या बोलण्याने जरी कुणाचे

मन दुखावले तर त्यालासुध्दा पाप म्हणतात. म्हणूनच भाद्रपदात क्षमावाणी महापर्व करतात. या दिवशी जैन लोक एकमेकांना गतवर्षात झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागतात. जैन धर्मातही दोन पंथ आहेत. श्वेतांबर आणि दिगंबर. पंथ दोन असले तरी २४ तिर्थकरांची पूजा, अर्चा, अभिषेक करतात.

भ. महावीर संसारात रमले नाहीत. जैन धर्माचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. माणसाने मरणाला कधीही घाबरू नये. जो मनुष्य मरणाला घाबरतो तो कधीच चांगले जगू शकत नाही. भगवान महावीर म्हणून, प्रत्येक आत्म्याने महावीरांसारखे व्हावे. भगवान महावीरांनी १२ वर्षे कठोर तपस्या केली. तेव्हाच त्यांना सत्यरूपी   ज्ञान प्राप्त झाले . ते संयमी व बुद्धिनिधी होते.

'महावीर' यातील प्रत्येक अक्षराचा महत्त्वा आहे. 'म' म्हणजे मन ताब्यात ठेवणे. 'हा' म्हणजे हाताने दान देणे, 'वी' म्हणजे वीरांपेक्षा गुण शिकणे. 'र' म्हणजे रत्नासारखे कार्य करणे. कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये. अहिंसा जैन धर्माचे सार आहे. यास्तव

भारतीय संविधानाच्या

  नंतरच्या पहिल्या पानावर भगवान महावीरांची छायाचित्र आहे

पाप बंधनातून

मुक्ती देणारी भूमी म्हणून     पावापुरीला  मान देतात.

भगवान महावीरांनी शेवटचा चातुर्मास पावापुरी   रजपूत राजाच्या शाळेत केला. ९६ गण्यांच्या राजांनी  पावापुरी  येथे येऊन महावीरांनीर्वाणोत्सव साजरा केला. आचार्य जिनसेन यांनी इ.स. ७८३ मध्ये हरिवंश पुराणाची रचना केली. दीपावली सण जैन बांधवांनी प्रथम पावापुरी येथे साजरा केला.

महावीरांची जीवनपद्धती ज्ञान, चारित्र्य, श्रध्दा देते. भगवान महावीरांनी निर्वाणपुर्वी सांगितले स्वतःचे दिले स्वतः व्हा. तुझी स्वतः प्रकाशन करा. तेव्हा दुसऱ्या कुणाच्या प्रकाशाची गरज भासणार नाही.

शब्दांकन

सुभाष शांताराम जैन

व्हाट्सअप  9821821885

Comments

Popular posts from this blog

*राया मला एक सिलेंडर आणून द्या* raya mala ek cylindar aanun dhya © self written: Subhash Shantaram Jain. नवीन नवरी म्हणते मला दागिना नको, आधी एक सिलेंडर आणून द्या, मला फिरायला नको, आधी एक सिलेंडर आणून द्या, जेवायला तुम्हाला घालते मी पण खाते, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, राया आधी सिलिंडर आणून द्या, राया माझ्या आई-वडिलांना पण बोलावू नका, राया आधी एक सिलेंडर आणा, राया वखारीतून थोडी लाकडं पण घेऊन या, कोळसा पण घेऊन या, आणि हो राया शेगडी आणायला विसरू नका, लोखंडी शेगडी घेऊन या, चुलीवरचे जेवण छान लागतं, आधी एकच शेगडी आणा. राया लवकर युद्ध थांबला नाही तर मला माहेरला पाठवून द्या, गाईचे शेंण करून गोळा करून शेण्या मी करीन, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, जंगलात मी जाईन, सुकलेली वाळलेली लाकडं मी गोळा करीन, ट्रम्प आग लागू तुझ्या लढाईला, आम्ही इकडे घायाळ झालो, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, बायकांचे हट्ट आता कमी होतील,जास्त पैसे मोजूनही सिलेंडर मिळेना म्हणून हॉटेलवाले लागले रडायला, हॉटेल लागले बंद पडायला, सिलेंडर संपले की लागेल शेगडी वापरायला, राया सिलेंडर साठी लढाई करू नका, ट्रम्प तुला सिलेंडर मिळाला का?का तुझ्या बायकोने पण तुला ठेवला उपाशी?ट्रम्प लढाई थांबव नाहीतर साऱ्या साऱ्या बायका घेऊन येतील तुझ्या घरावर मोर्चा कागदी लाल सिलेंडरचा. कागदी लाल सिलेंडरचा. ©स्वरचित: सुभाष शांताराम जैन,© self written Subhash Santhanam Jain.MAHARASHTRA INDIA . WHATSAPP :9821821885