नव वर्षाचा प्रथम दिवस प्रथम सण गुढीपाडवा
* नववर्षाचा प्रथम दिवस प्रथम सण गुढीपाडवा* हिंदूंचे नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते चैत्र महिन्यातील या प्रथम दिवशी लोक गुढी उभारून वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात साजरा करतात. यावर्षी 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे सकाळी सहा 53 नंतर गणेश पूजन व गुढी उभारावी
गुढीपाडवा हा सण खूप प्राचीन आहे. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षाचा पहिला दिवस आहे.प्राचीन ग्रंथात या दिवशी ब्रह्माने सृष्टी निर्माण केल्याचे वर्णन आहे. तसेच रामाने रावणावर विजय प्राप्त केल्याबद्दल राज्यातील नागरिकांनी या दिवशी घरोघरी गुढी उभारून रामाचे स्वागत केले. गुढीपाडवा सण विजयाचे प्रतीक म्हणूनही साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू वर विजय प्राप्त केल्याबद्दल विजय ध्वज म्हणूनही गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारतात.
या दिवशी सकाळी लवकर उठावे लावून आंघोळ करावे नवीन वस्त्र परिधान करावे गणेश पूजन करावे आणि गुढी उभा राहावे एक बांबूची काठी घ्यावी स्वच्छ पुसून घ्यावी. पाट घेऊन त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवावे. काठी घेऊन त्यावर नवीन साडी अथवा रेशमी भगवे पिवळे वस्त्र बांधावे. त्यावर कडुनिंबाची छोटी फांदी फुलांचा यांचा हार साखरगाठीचा हार बांधावा त्यावर तांब्याचा तांबा स्वस्तीक ॐ काढून ठेवावा.आणि ही गुढी पाटावर अथवा दारावर खिडकीत गच्चीत योग्य ठिकाणी लावावी. घरातील सर्व देवी देवतांना नमस्कार करावा.
गुढीपाडवा सण सुख-समृद्धी विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात.
गुढीपाडवा आनंदाचा सण असल्याने घरात श्रीखंड पुरी पुरणपोळी बासुंदी पुरी स्वादिष्ट भोजन बनवितात. गुढीपाडवा नवीन वर्षाचा प्रथम दिवस असल्याने आपल्या नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे जाऊन त्यांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा देतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस असल्याने नवीन वस्तूची खरेदी करतात. सोने दागिने कपडे जागा नवीन घर गाडी बंगला खरेदी करतात. गुढीपाडव्याच्या सणाच्या पूर्वीच दुकानदार लोक आपली दुकाने सजवून ग्राहकांना आकर्षित करतात सोन्याचे दुकान आहे कपड्याचे दुकान नवीन वस्तू आपल्या प्रियजनांना नवीन भेटवस्तू देण्यासाठी शोकेस मध्ये ठेवण्यासाठी छान वस्तू खरेदी करतात स्वतःसाठी व नातेवाईकांसाठी नातेवाईक मित्रांना भेटी देतात. या दिवशी सर्वांचे चेहरे एकदम फुललेले असतात.
आता तर गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा विविध शहरातून काढल्या जातात. ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ नाशिक सोलापूर विविध शहरांमधून गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक काढल्या जातात शोभायात्रा काढल्या जातात. स्त्रिया नऊवारी साडी घालून खूप नटतात. शोभा यात्रेमध्ये विविध प्रकारचे रथ सजविण्यात आलेले असतात. आपली संस्कृती आपला इतिहास समाजप्रबोध जनजागृती असे विविध विषय त्यात असतात. विज्ञान इतिहास संस्कृती इत्यादी विषयावरती रथ सजविले जातात. यामध्ये लेझीम फुगडी दांडपट्टा मल्लखांब नाच गाणी गायले जातात. शोभायात्रेत कुणी झाशीची राणी शिवाजी मावळे श्रीकृष्ण पेशवाईचे पेशवे सजून शोभायात्रेत सह सामील होतात. ढोल ताशांचा आवाज घुमतो. खूप आनंद देणारा हा सण गुढीपाडवा आहे.
©स्वरचितसुभाष शांताराम जैन.
ठाणे. व्हाट्सअप 9821821885.
©self written: Subhash Santram Jain Thane. WhatsApp 9821821885,
Comments
Post a Comment