प्रेम /LOVE
प्रेम (LOVE)
तरुणांनो तरुणींनो,
'माझे तुझ्यावर प्रेम आहे' म्हणणाऱ्यांनो,
जर ती व्यक्ती मेली तर?
तरी तुम्ही तिच्यावर प्रेम करणार कां?
उत्तर 'नाही' हेच येणार!
या दुनियेत कुणावाचून कुणाचेच,
अडत नाही मित्रांनो, मैत्रिणींनो,
प्रेम करणारेही म्हणतील उचला,
त्या व्यक्तीला वास येतोय,
लवकर न्या व्यक्तीला स्मशानात,
या दुनियेत कुणी कुणाचंच नसतं दोस्तांनो,
एकटा येणार एकटाच जाणार बंधुनो.
© स्वरचित: सुभाष शांताराम जैन, महाराष्ट्र, INDIA व्हाट्सअप 9821821885
दिनांक: २८ फेब्रुवारी २०२६
Comments
Post a Comment