*राया मला एक सिलेंडर आणून द्या* raya mala ek cylindar aanun dhya © self written: Subhash Shantaram Jain. नवीन नवरी म्हणते मला दागिना नको, आधी एक सिलेंडर आणून द्या, मला फिरायला नको, आधी एक सिलेंडर आणून द्या, जेवायला तुम्हाला घालते मी पण खाते, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, राया आधी सिलिंडर आणून द्या, राया माझ्या आई-वडिलांना पण बोलावू नका, राया आधी एक सिलेंडर आणा, राया वखारीतून थोडी लाकडं पण घेऊन या, कोळसा पण घेऊन या, आणि हो राया शेगडी आणायला विसरू नका, लोखंडी शेगडी घेऊन या, चुलीवरचे जेवण छान लागतं, आधी एकच शेगडी आणा. राया लवकर युद्ध थांबला नाही तर मला माहेरला पाठवून द्या, गाईचे शेंण करून गोळा करून शेण्या मी करीन, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, जंगलात मी जाईन, सुकलेली वाळलेली लाकडं मी गोळा करीन, ट्रम्प आग लागू तुझ्या लढाईला, आम्ही इकडे घायाळ झालो, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, बायकांचे हट्ट आता कमी होतील,जास्त पैसे मोजूनही सिलेंडर मिळेना म्हणून हॉटेलवाले लागले रडायला, हॉटेल लागले बंद पडायला, सिलेंडर संपले की लागेल शेगडी वापरायला, राया सिलेंडर साठी लढाई करू नका, ट्रम्प तुला सिलेंडर मिळाला का?का तुझ्या बायकोने पण तुला ठेवला उपाशी?ट्रम्प लढाई थांबव नाहीतर साऱ्या साऱ्या बायका घेऊन येतील तुझ्या घरावर मोर्चा कागदी लाल सिलेंडरचा. कागदी लाल सिलेंडरचा. ©स्वरचित: सुभाष शांताराम जैन,© self written Subhash Santhanam Jain.MAHARASHTRA INDIA . WHATSAPP :9821821885

Comments

  1. राया मला एक सिलेंडर आणून द्या छान कविता

    ReplyDelete

Post a Comment